Drought Crisis:चारा-पाण्याअभावी जनावरे विकण्याची वेळ;दुष्काळाच्या झळा; जांब बुद्रुकच्या आठवडे बाजारात पशुधनाचे भाव घसरले

Cattle Prices Fall : लातूर जिल्ह्यातील जळकोट परिसरात चारा आणि पाणीटंचाईमुळे पशुपालक अडचणीत आले आहेत. जांब बुद्रुकच्या आठवडे बाजारात दुष्काळामुळे जनावरांचे भाव ४० ते ५० टक्क्यांनी घसरल्याचे सांगण्यात आले.
Farmers bring livestock to Jamb Budruk weekly market as drought and fodder shortages push cattle prices down.

Farmers bring livestock to Jamb Budruk weekly market as drought and fodder shortages push cattle prices down.

esakal

Updated on: 

जळकोट, : चारा आणि पिण्याच्या पाण्याअभावी जनावरे जगवायची कशी, असा प्रश्न पशुपालकांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळे पोटच्या मुलाप्रमाणे सांभाळलेल्या जनावरांची विक्री करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. जांब बुद्रुक येथील आठवडे बाजारात शनिवारी पशुधन विक्रीसाठी मोठ्या प्रमाणावर आणण्यात आले होते. मात्र, दुष्काळामुळे जनावरांचे भाव जवळपास ५० टक्क्यांनी घसरल्याने शेतकऱ्यांनी सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com