

Latur News
esakal
जळकोट: या डोंगरी तालुक्यात सिंचन क्षेत्र अत्यल्प असल्याने वाढत्या उन्हात जनावरांचे संगोपन करताना पशुपालकांची मोठी दमछाक होत आहे. राने उजाड झाल्याने चाऱ्याच्या शोधासाठी पशुपालकांना वणवण भटकावे लागत आहे. पावसाळ्यापर्यंतचे दोन-तीन महिने कसे काढायचे?, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.