

Latur News
esakal
जळकोट: सध्याच्या परिस्थितीत देशभरात गॅसची टंचाई जाणवत असून, स्वयंपाकासाठी लागणारा एलपीजी गॅस मिळणे कठीण झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने पर्याय म्हणून घरगुती वापरासाठी केरोसीन उपलब्ध करून देण्याची तयारी सुरू केली आहे. तालुक्यात रेशन दुकानदार व केरोसीन विक्रेत्यांचे परवाने नूतनीकरणाचे काम सुरू असून, केरोसीन साठवण व वितरणाबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.