जळकोट नगरपंचायतीसाठी इच्छुक लागले तयारीला, प्रभाग रचना प्रक्रिया सुरू

कोरोनाची दुसरी लाट ओसल्याने निवडणूक विभागाने निवडणुकीची तयारी केली आहे. त्या अनुषंगाने इच्छुकही तयारीला लागले आहेत
जळकोट
जळकोटजळकोट
Summary

कोरोनाची दुसरी लाट ओसल्याने निवडणूक विभागाने निवडणुकीची तयारी केली आहे. त्या अनुषंगाने इच्छुकही तयारीला लागले आहेत

जळकोट (लातूर): नगरपंचायत निवडणुकीसाठी वॉर्ड रचना प्रक्रियेला सोमवारपासून (ता. २३) सुरुवात होत आहे. दरम्यान, निवडणूक जवळ आल्याने इच्छुक तयारीला लागले आहेत. नोव्हेंबर २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधित ज्या नगरपंचायतमधील पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपला आहे त्यांच्या सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी वॉर्ड रचनेच्या कामाला सोमवारपासून प्रारंभ होत आहे. यामध्ये जळकोट नगरपंचायतीचाही समावेश आहे. जळकोट नगरपंचायतीच्या सदस्यांचा कार्यकाळ २६ नोव्हेंबर २०२० ला संपली आहे. दरम्यान, कोरोनामुळे निवडणूक होऊ शकली नाही. सध्या नगरपंचायतीच्या प्रशासकपदी उदगीरचे उपविभागीय अधिकारी प्रवीण मेंगशेट्टी आहेत. आता कोरोनाची दुसरी लाट ओसल्याने निवडणूक विभागाने निवडणुकीची तयारी केली आहे. त्या अनुषंगाने इच्छुकही तयारीला लागले आहेत.

भाजपने दिले तीन नगराध्यक्ष-

गतवेळी नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाले. व्यंकट तेलंग यांना पहिला नगराध्यक्ष होण्याचा बहुमान मिळाला. त्यानंतर अवघ्या सहा महिन्यांसाठी उस्मान मोमीन यांची अध्यक्षपदी वर्णी लागली. नंतर दुसऱ्या अडीच वर्षाच्या कालावधीसाठी नगराध्यक्षपदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी आरक्षित झाले. त्यावेळी भाजपाचेच किशन धुळशेट्टे यांची अध्यक्षपदी वर्णी लागली. पाच वर्षांत नगरपंचायतमध्ये भाजपने जळकोटकरांना तीन नगराध्यक्ष दिले.

जळकोट
गावाच्या शिवारात येताच पत्नीचा दुचाकीवरुन पडून मृत्यू

आघाडी होणार का?

येथे सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापनेपासून भाजपला रोखण्यासाठी राज्याप्रमाणे विरोधकांची महाविकास आघाडी होणार का, याकडे शहवासियांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, सर्वच पक्ष तयारी करीत आहेत. भाजप, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाइं, एमआयएम यांनी बैठक घेणेही सुरू केले आहे.

आघाडी झाल्यास काय?

१७ सदस्य संख्या असलेल्या जळकोटमध्ये जर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी झाली तर अनेक इच्छुकांचा हिरमोड होणार आहे. पाच वर्षांपासून ज्यांनी तयारी केली त्यांना उमेदवारी मिळेल की नाही, असा प्रश्न असेल. जर महाविकास आघाडी झाली तर बंडाळीची शक्यताही असेल.

जळकोट
हिंगोलीत सराफा व्यावसायिकांनी पुकारले एकदिवसीय बंद

भाजप स्वबळावर

नगरपंचायतमधील सत्ताधारी असलेला भाजप स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. दरम्यान, नगराध्यक्षाचे आरक्षण निवडणुकीपूर्वीच जाहीर झालेले आहे. त्यामुळे अनेक नवीन उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. नगरपंचायतीची मुदत संपवून वर्ष झाले असल्याने शहराचा विकास खुंटला आहे. निवडणुका लवकर झाल्यास शहराच्या विकासाला गती मिळणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com