

Latur Water News
esakal
जळकोट: तालुक्यात यंदा पावसाळ्यात चांगला पाऊस झाल्याने तालुक्यातील जलसाठे समाधानकारक होते. मात्र पाण्याचा उपसा सुरू राहिला. त्यासोबतच अचानक उन्हाचा तडाखा वाढत आहे. परिणामी बाष्पीभवन होऊन जलसाठ्यात घट होत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
तालुक्यात एकूण १४ साठवण तलाव आहे. पावसाळ्यात जवळपास सर्वच साठवण तलाव शंभर टक्के भरले होते. मात्र, फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा व मार्च महिना सुरू होताच उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचा परिणाम जलसाठ्यांवर होत आहे. सध्या तालुक्यातील बहुतांश महत्त्वाच्या तलावातील जलसाठा निम्म्यावर आलेला आहे.