

Latur News
esakal
जळकोट: ‘साहेब, महिनाभरापासून पाणीटंचाई हाय. तांड्यापासून दूर असलेल्या विहिरीवरून पाणी आणावं लागतंय. जनावरांसाठी, कपडे धुण्यासाठी पाणी आणावं कुठून? वरिसभर पाण्याची हीच अडचण. एकीकडे तापलेलं ऊन अन् दुसरीकडं पाण्यासाठी हैराणी अशी अवस्था उन्हाळ्यात आसतीया. सगळी कामं सोडून आगुदर पाण्यासाठी जावं लागतंय’, अशा शब्दांत वाघमारी तांड्यावरील नागरिकांनी भीषण पाणीटंचाईची व्यथा व्यक्त केली.