Jalna : जालना जिल्ह्यात कारची दोन दुचाकींना जोराची धडक, एक जण ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalna : जालना जिल्ह्यात कारची दोन दुचाकींना जोराची धडक, एक जण ठार
Jalna : जालना जिल्ह्यात कारची दोन दुचाकींना जोराची धडक, एक जण ठार

Jalna : जालना जिल्ह्यात कारची दोन दुचाकींना जोराची धडक, एक जण ठार

जामखेड (जि.जालना) : जामखेडजवळ भरधाव वेगात जाणाऱ्या कारने (एमएच ०४ एफए ४५७४) पाचोडहून येणाऱ्या दोन दुचाकींना जोराची धडक दिली. यात दुचाकीवरील (एमएच २० ईटी २१०८) व्यक्तीचा जागीच मृत्यु, , तर दुसऱ्या दुचाकी (एमएच २१ बीएल ६२८१) वरील विलास सुधाकर डोंगरे (वय २२, नांदी ता.अंबड) हा तरुण गंभीर जखमी झाला. अपघाताची घटना आज बुधवारी (ता.१७) घडली. त्याच्यावर पाचोड (Jalna) येथे उपचार सूरु आहे. कारचालक फरार झाला आहे.

हेही वाचा: पंतप्रधान मोदींकडून अर्थ राज्यमंत्री भागवत कराडांवर कौतुकाची थाप

अपघाताची माहिती कळताच जामखेड व परिसरातील ग्रामस्थांनी अपघातस्थळी गर्दी केली होती.

loading image
go to top