Jalna Child Kidnapping : भरदिवसा ३ वर्षांच्या चिमुरड्याचे अपहरण; जालना पोलिसांनी ४ तासात शेतातून केली सुखरूप सुटका!

Rescue Operation : पोलिसांनी ४ तासांच्या अथक परिश्रमानंतर शेतातून सुखरूप सुटका केली आहे. पोलिसांच्या प्रचंड दबावामुळे अपहरणकर्ते बालकाला सोडून पसार झाले असून परिसरात समाधानाचे वातावरण आहे.
Daylight Kidnapping of 3-Year-Old Boy Shakes Mardi Village

Daylight Kidnapping of 3-Year-Old Boy Shakes Mardi Village

sakal

Updated on

अंबड (जालना) : जालना जिल्हयातील अंबड तालुक्यातील मार्डी येथील तीन वर्षीय बालकाचे अपहरण करण्याची घटना भरदिवसा दुपारी घडली आहे.यामुळे नातेवाईक, ग्रामस्थ,पोलिस यांची मुलाचा शोध घेण्यासाठी एकच धांदल उडाली होती.याबाबत सविस्तर माहिती अशी की,जालना जिल्हयातील अंबड शहरापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या मार्डी गावातली एक तीन वर्षीय संजय वाल्मीक राऊत हा बालक मार्डी - हस्तपोखरी रोडवरील केदार राऊत यांच्या दुकानापुढे खेळत असताना मंगळवारी दुपारी एक वाजेच्या दरम्यान बालकास कोणीतरी चारचाकी वाहनातून घेऊन गेल्याची घटना गावातील एका महिलेच्या लक्षात येताच तिने आरडाओरड करून ग्रामस्थांना या बाबत माहिती दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com