

Jalna News
esakal
जालना: उन्हाची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून मंगळवारी (ता.१४) तापमानाने चाळिशी ओलांडली. कृषी विज्ञान केंद्र येथे शहराचे कमाल तापमान ४०.३ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले. दरम्यान, पुढील १६ आणि १७ एप्रिल रोजी जिल्ह्यात उष्णतेचा येलो अलर्ट कुलाबा प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिला आहे.