esakal | दिलासादायक! जालन्यात कोरोना रुग्णसंख्या घटली
sakal

बोलून बातमी शोधा

covid 19

दिलासादायक! जालन्यात कोरोना रुग्णसंख्या घटली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जालना: जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या घटली आहे. शनिवारी (ता.१९) दोन जणांचा कोरोनामुळे (jalna covid 19 updates) मृत्यू झाला तर ३८ रुग्ण नवीन आढळून आले. दिवसभरात २५ रुग्ण कोरोनामुक्त झालेत. त्यामुळे सध्या ३१६ सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची दुसरी लाट आली होती. आता कोरोनाची दुसरी लाट कमी झाली आहे. शनिवारी (ता.१९) जिल्ह्यात एक हजार ३८८ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये ३८ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.

जालना शहरात दहा, तालुक्यातील रामनगर साखर कारखाना येथील तीन, परतूर तालुक्यातील आष्टी, आनडगाव येथील प्रत्येकी एक, घनसावंगी तालुक्यातील एकलहरा, सिंदखेड, अंतरवाली दायी, दैठणा, अव्वलगाव येथील प्रत्येकी एक, अंबड शहरातील दोन, तालुक्यातील रोहिलागड, कासारवाडी येथील प्रत्येकी दोन, मठ जळगाव तांडा, लखमापुरी, पिंपळगाव, खानापूर, शहागड, भारडी येथील प्रत्येकी एक, बदनापूर तालुक्यातील ढासला येथील दोन, जाफराबाद तालुक्यातील टाकळी, भोकरदन तालुक्यातील अन्वा, अडगाव येथील प्रत्येकी एक जणांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे आतापर्यंतची रुग्णसंख्या ६० हजार ९९६ एवढी झाली आहे.

हेही वाचा: टँकरच्या अपघातानंतर डिझेल चोरीसाठी औरंगाबाकरांची गर्दी; पहा फोटो

शनिवारी दोन कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत एक हजार १३४ रुग्णांचा जीव गेला आहे. दरम्यान, शनिवारी २५ कोरोना रुग्णांनी उपचारानंतर कोरोनावर मात केली आहे. आतापर्यंत ५९ हजार ५४६ रूग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या जिल्ह्यात ३१६ सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जालना कोरोना मीटर
एकूण कोरोनाबाधित : ६०,९९६
एकूण कोरोनामुक्त : ५९,५४६
एकूण मृत्यू : ११३४
उपचार सुरू : ३१६

loading image
go to top