esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

तलवार घेऊन नाचणारे चौघे पकडले

जालना : तलवार घेऊन नाचणारे चौघे पकडले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जालना : वाढदिवस साजरा करताना तलवार हातात घेऊन नाचणाऱ्या चार जणांना सदर बाजार पोलिसांनी मंगळवारी (ता.१२) पकडले आहे. दरम्यान, संशयितांना न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

शहरातील भीमनगर येथे सोमवारी (ता.११) काही जण हातात तलवार घेऊन नाचत वाढदिवस साजरा करत असल्याची माहिती सदर बाजार पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन संशयित गौतम बबन गवई (रा.२१), मोहम्मद फारूक (दोघे रा.भीमनगर, जालना) या दोघांना ताब्यात घेतले.तसेच त्यांच्याकडून एक तलवार जप्त केली. त्यानंतर पळून गेलेले अॅलन ऊर्फ मिकी पाटोळे, सिद्धार्थ मुळे (दोघे रा. भीमनगर, जालना ) या दोघानाही पकडले. या चार संशयितांना मंगळवारी न्यायालयासमोर हजर केले असता या चौघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.

हेही वाचा: Corona Update : राज्यातील रुग्ण आणि मृत्यूसंख्येत वाढ

ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, नितीन काकलवार, सहायक पोलिस उपनिरीक्षक परशुराम पवार, कर्मचारी इर्शाद पटेल, सकुद्दीन तडवी, मनोहर भुतेकर, एस. ई. मुऱ्हाडे, फड यांनी केली.

loading image
go to top