जालना : तालुक्यातील रामनगर येथे किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये शुक्रवारी (ता.११) रात्री तुंबळ हाणामारी झाली. दोन्ही गटातील सहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी (Maujpuri Police) दिली आहे. दरम्यान, घटनास्थळावर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला असून रात्री उशिरापर्यंत तणावपूर्ण शांतता होती.