Jalna : सायबर भामट्यांनी अंथरले ‘नेट’

वर्षभरात ६२ जण जाळ्यात, क्षणात बँक खाते रिकामे
cyber crime
cyber crimesakal media

जालना : इंटरनेटमुळे जग मुठीत आले. एका क्लिकवर अनेक कामे होत आहेत. मात्र, या डिजिटल युगात बेफिकीर राहणारे अनेक जण ऑनलाइन फसवणुकीचे शिकार झाले आहेत. मागील साडेआठ महिन्यात सुमारे ६२ ऑनलाइन फसवणुकीचे गुन्हे नोंद झाले असून, सुमारे १५ लाख रुपये सायबर भामट्यांनी लंपास केले आहेत. या गुन्ह्यांचा सायबर शाखेकडून तपास सुरू आहे. मात्र, स्वतःच्या निष्काळजीपणामुळे काही भामट्यांना डल्ला मारण्याची संधी मिळत असल्याचे चित्र आहे.

आजघडीला बहुतांश नागरिकांकडे स्मार्ट फोन आहे. कमी खर्चामध्ये प्रत्येक दिवसाला दीड ते दोन जीबी डाटा मिळत आहे. त्यात डिजिटल युग असल्याने प्रत्येकाचे बँक खाते हे आधार आणि मोबाइल क्रमांकाशी लिंक आहे. स्मार्टफोनद्वारे नेट बँकेसह फोन पे, गूगल पे, पेटीएम, भीम ॲप अशा विविध माध्यमातून ऑनलाइन व्यवहार केले जातात. मात्र, सोशल मीडियासह बनावट लिंक शेअर करून आमिष दाखविले जाते. यात कमी किमतीमध्ये मिळणाऱ्या वस्तूसह ऑनलाइन कर्जाचे आमिष दाखवून अनेकांचे बँक खाते रिकामे केल्याच्या घटना घडल्या आहेत.

जुन्या ट्रिक्स वापरून फसवणूक

सायबर क्राइम करताना इतर राज्यातील भामट्यांकडून वीज बिले भरले नाही, क्रेडिट कार्ड बंद पडेल, ऑनलाइन जॉब मिळेल, ऑनलाइन कर्ज देतो, अशी विविध आमिषे दाखवून बँक खात्यातील रक्कम लंपास केली जात आहे. या आमिषाला अनेक जण बळी पडत आहेत.

ओटीपीसह बँक खात्याची माहिती देऊ नका

मोबाइलवर आलेला ओटीपी नंबर आणि बँक खात्याची माहिती कोणालाही देऊ नका. या ओटीपीसह बँक खात्याशी संबंधित माहिती, एटीएम कार्डवरील १६ अंकी नंबर, एटीएम पीनची माहिती दिल्यानंतर ऑनलाइन आर्थिक फसवणुकीचे प्रकार घडतात. शिवाय बँकेच्या ग्राहक सेवा केंद्राकडून ग्राहकांकडे या संदर्भातील माहिती कधीच विचारली जात नाही. त्यामुळे फसवणूक टाळण्यासाठी एटीएम, बॅंकेसंदर्भातील माहितीसह ओटीपी देणे टाळणे हीच एक सुरक्षितता आहे. शिवाय कुठलेही ॲप डाउनलोड करताना त्याला काय परवानग्या देतो, हे तपासून घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com