esakal | जालना जिल्हा सहकारी बँकेची शाखा फोडली, सहा दरोडेखोर अटकेत
sakal

बोलून बातमी शोधा

3crime_201_163

परतूर तालुक्यातील वाटूर येथील जालना जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची शाखा फोडणाऱ्या सहा दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी (ता.२६) अटक केले आहे.

जालना जिल्हा सहकारी बँकेची शाखा फोडली, सहा दरोडेखोर अटकेत

sakal_logo
By
उमेश वाघमारे

जालना : परतूर तालुक्यातील वाटूर येथील जालना जिल्हा मध्यवर्ती बॅंकेची शाखा फोडणाऱ्या सहा दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी (ता.२६) अटक केले आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम, संगणक, बॅंकेची तिजोरी, बॅटऱ्या, चोरीच्या पैशाने खरेदी केलेला कॅमेराला, मोबाइल असा साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी दिली आहे.

अतिवृष्टीग्रस्तांना या निकषावर मिळणार मदत, उद्यापर्यंत नुकसानीचा मिळणार अहवाल

परतूर तालुक्यातील वाटूर येथील जिल्हा मध्यवर्ती बॅंकेवर ता.२१ आॅक्टोबर रोजी रात्री दरोडा पडला होता. यावेळी दरोडेखोरांना बॅंकेच्या तिजोरीसह रोख रक्कम, संगणक, बॅटऱ्या, सीसीटीव्ही डिव्हीआर, इन्व्हर्टर, टेबल फॅन असा एकूण सहा लाख ९७ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या प्रकरणी परतूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना खबऱ्यामार्फत या दरोड्यातील संशयितांची माहिती मिळाली.

महिला, बालकांवरील गुन्ह्यात वाढ! महिलांवरील ३० टक्के गुन्हे पती, नातेवाईकांशी संबंधित

त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने संशयित दरोडेखोर सागर डुकरे (रा. शनि मंदिर, जालना), अभिषके कुलकर्णी (रा. आनंदी स्वीम गल्ली, जालना), सुनील झीने, आनंद वानखेडे (रा. इंदीरानगर, जालना), विनोद तांबेकर (मंम्मादेवी, जालना) व कृष्णा गजमल (रा. डासाळा, ता. सेलू,जि. परभरणी) या सहा जणांना अटक केली. त्यांच्याकडून तीन लाख ७१ हजार रुपयांची चोरीची रोकड जप्त करण्यात आली आहे. चोरीच्या पैशांने खरेदी केलेला कॅमेरा, मोबाईल ही जप्त करण्यात आला आहे. तसेच बॅंकेची तिजोरी, बॅटऱ्या, संगणक हे नखाते हातगाव (ता. सूले जि. परभणी) शिवारातील एका विहीरीतून जप्त करण्यात आले आहे. तसेच गुन्ह्यात वापरलेले कटर, दोन कार, दोन दुचाकी ही स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांनी दिली आहे.

गुन्हे उघड येण्याची शक्यता
या टोळीकडून वाटमारी, लुटमारी केलेले चार ते पाच गुन्हे उघडकी येण्याची शक्यता आहे. त्यानुसार पोलिसांकडून या सहा दरोडेखोरांकडे चौकशी सुरू आहे.

संपादन - गणेश पिटेकर

loading image