Silk farming skill training center : शेतकरी अन् सुशिक्षित तरुणांसाठी मोठी बातमी! रेशीम उद्योगाला गती देण्यासाठी 'या' जिल्ह्यात सुरू होणार विशेष प्रशिक्षण केंद्रे; रोजगाराची सुवर्णसंधी

Integrated sericulture development program : धागा निर्मितीपासून विणकामापर्यंत ७ मोफत अभ्यासक्रम; तरुणांना थेट स्वयंरोजगाराचे बळ, पाहा कसा घेता येईल लाभ?
Integrated Skill Development Program' launched for silk industry in Jalna

Integrated Skill Development Program' launched for silk industry in Jalna

Sakal

Updated on: 

मराठवाड्यातील दुष्काळी पट्ट्यात शेतकऱ्यांसाठी आर्थिक वरदान ठरलेल्या रेशीम उद्योगाचा कायापालट करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना हक्काचा रोजगार मिळवून देण्यासाठी राज्य शासनाने अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. जालना जिल्ह्यातील रेशीम शेतीचा सर्वांगीण विकास करणे, उत्पादनाचे थेट मूल्यवर्धन करणे आणि स्थानिकांना मोठ्या प्रमाणावर स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने 'एकात्मिक कौशल्य विकास कार्यक्रम' राबवण्यात येत आहे. या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत जिल्ह्यात विविध ठिकाणी अत्याधुनिक 'कौशल्य प्रशिक्षण केंद्रे' स्थापन केली जाणार आहेत.

केवळ कोष उत्पादनापुरते मर्यादित न राहता रेशीम धागा निर्मितीपासून ते थेट कापड तयार करण्यापर्यंत कुशल मनुष्यबळ घडवण्याचा निर्धार या योजनेतून करण्यात आला आहे.

Loading content, please wait...