जालना: जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जुन्या इमारतीच्या मागील भागातील कचरा अज्ञाताने मंगळवारी (ता. २८) पेटवून दिला. कचरा पेटवल्यानंतर ही आग परिसरातील वाळलेल्या गवताला लागल्याने वणवा पेटला. .४० मिनिटांच्या अथक परिश्रमानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग आटोक्यात आणली. त्यामुळे परिसरात दुरुस्तीसाठी उभी असलेली वाहने आगीपासून बचावली..रुपाली चाकणकर यांना मोठा धक्का, सख्ख्या भावाचा निवडणुकीत दारुण पराभव.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जुन्या इमारतीच्या खिडक्यांतून कचरा खाली टाकला जातो. यामध्ये कागदांचा समावेश असतो. त्यामुळे येथे कचऱ्याचा ढीग साचला आहे. हा कचरा वारंवार पेटवला जातो..मंगळवारी (ता. २८) इमारतीच्या मागील भागातील कचरा अज्ञाताने पेटवून दिला. कचऱ्यासोबत वाळलेल्या गवतानेही पेट घेतल्याने वनवा पेटला. त्यामुळे येथील झाडे आगीत होरपळून निघाली.विशेष म्हणजे, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागील बाजूस जुनी तसेच दुरुस्तीसाठी उभी असलेली वाहने होती. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर ४० मिनिटांच्या अथकपरिश्रमानंतर आग आटोक्यात आणण्यात आली..Kolhapur Gokul Milk Sangh : गोकुळ दूध संघावर प्रशासक की निवडणूक? अध्यक्ष नविद मुश्रीफांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या बैठकीचा केला खुलासा.सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परिसरातही आगसार्वजनिक बांधकाम विभागाच्या पाठीमागील भागातही आग लागली. यात काडी-कचऱ्यासह लाकडे खाक झाली. येथे अग्निशमन दलाच्या जवानांनी एका बंबाच्या मदतीने ही आग आटोक्यात आणली. दरम्यान, एकाच दिवशी दोन शासकीय कार्यालयांच्या परिसरात आगीच्या घटना घडल्या..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.