

Jalna News
esakal
जालना: मागील २३ दिवसांपासून गॅस टंचाईला नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. त्यात ऑनलाइन गॅस बुकिंग होत आहे. मात्र, बुकिंग केल्यानंतर तब्बल १५ दिवसांची वेटिंग आहे.
त्यामुळे घरपोच गॅस पुरवठा करणाऱ्या वितरकांना ग्राहकांकडून फोन करून गॅस सिलिंडर कधी मिळणार, अशी विचारणा होत आहे. ग्राहकांच्या सतत येणाऱ्या फोनमुळे वितरक त्रस्त झाले आहेत.