जालना : सततच्या पावसाने पिकांना फटका

घनसावंगी तालुक्यातील चित्र, उत्पन्न घटण्याची चिन्हे
Jalna Ghansawangi heavy rain farmer crop damage
Jalna Ghansawangi heavy rain farmer crop damage

घनसावंगी : समाधानकारक पाऊस असला तरी संततधार पावसामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या कष्टाने फुलवलेल्या शेतशिवारावरील खरीप हंगामातील पिकांवर अस्मानी संकटाने कहर केला आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकांचे डोळ्यांदेखत पिवळे पडण्याबरोबर सडण्याची चिन्हे पाहता यंदाही आर्थिक उत्पन्नात घट होणार असल्याचे चित्र आहे.

घनसावंगी तालुक्‍यात यंदा पावसाळ्यात पहिल्यांदा जून महिना कोरडा गेला परिणामी खरिपांच्या पेरण्या लांबल्या होत्या परंतु त्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवड्‌यात सुरू झालेल्या संततधार भिज पाऊस, तर कधी मध्यम, कधी रिमझिम तर कधी जोरदार अशा पावसामुळे खरिपांच्या हंगामाची पेरणी पावसांच्या उघडिपीनंतर झाली मात्र हा पाऊस सतत होत असल्याने पिकांच्या मशागतीत खंड पडला. जमिनीत ओलीचे प्रमाण वाढल्याने शेतकरी वाफसा येण्याची वाट पाहत असताना ही सर्वत्र सततच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे.

खुरपणी, कोळपणी, औतांच्या पाळ्या हुकल्याने पिकांच्या मशागतीची कामे लांबली आहे. सततच्या भिज पाऊस व पावसाचा खंड अशा भिन्न परिस्थितीत काही ठिकाणी बीटी कापूस पिकावर बुरशीचा प्रादुर्भाव होत असल्याने आकस्मिक मर आल्याचे चित्र समोर येत आहे. सोयाबीनच्या झाडालाही या पावसामुळे सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे सोयाबीनच्या पाने पिवळी पडत आहे.

पाने पिवळी पडल्यामुळे वाढ खुंटते आणि उत्पादनही कमी येते परिणामी शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नात घट होण्याची शक्‍यता आहे. दुसरीकडे शेतकऱ्यांनी कीटकनाशकांची फवारणी करून शेतात साचलेले पाणी प्रथम शेताबाहेर काढावे समस्या दूर करावी असे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे.

अशी घ्या पिकांची काळजी

सततचा पाऊस व बदलते वातावरण लक्षात घेता पिकांची काळजी घेण्याचा सल्ला कृषी विज्ञान केंद्राचे शास्‍त्रज्ञ अजय मिटकरी यांनी दिला आहे. ज्या शेतकरी कापूस पिकास बेसल डोस दिला नाही त्यांनी तो द्यावा किंवा कापूस लागवड करून एक महिना झाला आहे अशा शेतकऱ्यांनी युरियाचा डोस विभागून द्यावा. जास्त युरियाचा वापर केल्यास पिकाची कायिक वाढ होऊन किडीचा प्रादुर्भाव वाढतो, त्यामुळे नत्र पिकास विभागून द्यावा.

सोयाबीन पिकात खोड माशीचा प्रादुर्भाव दिसू शकतो, त्यामुळे शेतकऱ्यांनी कीटकनाशक व बुरशीनाशकाचा व फेरस सल्फेट व १९.१९.१९ वापर करावा. वाफसा परिस्थितीमध्ये २५ ते ३० दिवसाच्या कापूस पिकास जमिनीतील जस्ताची उपलब्धता होण्यासाठी, १ लीटर ट्रायकोडर्मा १०० लीटर पाण्यात मिसळून झाडाजवळ आळवणी करावी. महिलांनी सायकल कोळपण्याचा वापर करावा जेणेकरून महिलांचे श्रम व वेळ वाचेल, असे अजय मिटकरी यांनी नमूद केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com