

Jalna News
esakal
जालना: जालना जिल्हा योगासन स्पोर्ट असोसिएशन, क्रीडा विभाग जालना व जिल्हा शिक्षण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने प्रथमच मुली व महिलांसाठी भव्य योगासन स्पर्धा घेण्यात येत आहे. ही स्पर्धा ‘अस्मिता सिटी लीग’अंतर्गत येत्या रविवारी (ता. २२) शहरातील महेश भवन येथे होणार असून, सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.