

Jalna News
esakal
जालना: शहरात सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळेत जड वाहतुकीस बंदी आहे. मात्र, पोलिसांच्या आशीर्वादाने शहरातून सर्रास जड वाहतूक सुरू आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न कायम ऐरणीवर आहे. याशिवाय या जड वाहतुकीमुळे लहान मुलांसह नागरिकांचा जीवही टांगणीला लागला आहे. त्यात जुना जालना भागातील मुक्तेश्वर द्वार ते रेल्वे स्थानक या रस्त्यावर रेल्वे स्थानकातून येणारा माल घेऊन जाणाऱ्या भरधाव ट्रकची दिवसभर रेलचेल असते. त्यामुळे या परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.