
जालना : मोती तलावात 'अवैध' पाणी उपसा
जालना : शहरातील मोतीबाग तलावात मोठ्या प्रमाणावर अवैध पाणी उपसा सुरू आहे. दरम्यान, बुधवारी तहसीलदार, पोलिस, औद्योगिक महामंडळ, नगरपालिका आणि महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मोती तलाव परिसरात अवैध उपसा रोखला, तसेच विद्युत पंप, पाईप, विजेचे वायरही जप्त करण्यात आले आहे.
शहरातील मोतीबाग तलावातून अवैध पाणी उपसा केला जातो. यासंदर्भात प्रशासनाकडे अनेक तक्रारी करण्यात आल्या होत्या. त्यानंतर तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांच्यासह चंदनझिरा पोलिस, औद्योगिक महामंडळ, नगरपालिका आणि महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी मोतीबाग तलावात पाहणी केली.
त्यानंतर अवैध पाणी उपसा रोखला. या कारवाईत चार विद्युत पंप, चार सबमर्सिबल पंप, पाण्याचे पाईप व वीज जोडणीचे वायर जप्त करण्यात आले. दरम्यान, हा पाणी उपसा कोण करत होत, हे अद्यापि स्पष्ट झाले नसून यासंदर्भात रात्री उशिरापर्यंत कोणताही गुन्हा दाखल झाला नव्हता.
Web Title: Jalna Illegal Water Abstraction Moti Lake Municipal Team Electricity Pump Confiscated
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..