

Jalna News
esakal
जालना: औद्योगिक वसाहत येथे शेकडो कोटींची उलाढाल होते. त्यामुळे कंपन्यांची रोकड घेऊन जाणाऱ्यांवर पाळत ठेवून या भागात वाटमाऱ्यासारख्या घटना घडतात. या घटनांना आळा बसावा, यासाठी जालना स्टील मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने पुढाकार घेत औद्योगिक वसाहत येथे प्रवेश करणाऱ्या आणि बाहेर पडणाऱ्या प्रमुख मार्गावर वीस सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्यामुळे औद्योगिक वसाहत तिसऱ्या डोळ्याच्या निगराणीखाली आली आहे.