

Jalna Jalgaon Railway Land Acquisition Draws Anger From Farmers Over Route Through Fertile Agricultural Fields
esakal
'-राहुल पारवे
पालोद : "जमिनी आम्हाला कोण्या राजकीय व्यक्तीने घेऊन दिलेल्या नाहीत, त्या आमच्या हक्काच्या आहेत. जीव देऊ पण जमिनी सोडणार नाही," असा आक्रमक आणि संतापजनक पवित्रा जालना-जळगाव रेल्वे बाधित शेतकऱ्यांनी घेतला आहे. रात्री उशिरापर्यंत खेळणा फाटा येथे सुमारे ४०० ते ५०० बाधित शेतकऱ्यांनी जालना-छत्रपती संभाजीनगर मतदारसंघाचे खासदार डॉ. कल्याण काळे यांची वाट पाहून आपली आपबीती मांडली आणि प्रशासनाच्या चुकीच्या धोरणांवर तीव्र निषेध नोंदवला.