

Jalna Lakkadkot Crime
esaksl
जालना : पतीने पत्नीची गळा चिरून खून केल्याची घटना शहरातील लक्कडकोट भागात शनिवारी (ता. १९) रात्री नऊच्या सुमारास घडली. आफ्रिन काजी (वय ३८) असे मृत महिलेचे नाव आहे. दरम्यान, संशयित पती पोलिसांच्या ताब्यात आहे. लक्कडकोट परिसरात राहणाऱ्या नईम काजी आणि त्याची पत्नी आफ्रिन यांच्यात मागील काही दिवसांपासून कौटुंबिक वाद सुरू होता.