esakal | Traffic Jam: जाफराबादेत सिमेंट रस्त्यांची कामं ठरतायेत वाहतूकीच्या कोंडीचे कारण; प्रशासनाचे दुर्लक्ष

बोलून बातमी शोधा

jalna}

शहरातील शिवाजी चौक ते अहिल्यादेवी होळकर चौकापर्यंत विविध ठिकाणी वाहतूकीची  मोठी कोंडी होत आहे

Traffic Jam: जाफराबादेत सिमेंट रस्त्यांची कामं ठरतायेत वाहतूकीच्या कोंडीचे कारण; प्रशासनाचे दुर्लक्ष
sakal_logo
By
गजानन ऊदावंत

जाफराबाद (जालना): जाफराबाद शहरात मागील चार ते पाच महिन्यांपासून संथ गतीने सिमेंट रस्ते आणि नाली बांधकाम सुरु असल्याने शहरातील वाहतूक मोठ्या प्रमाणात विस्कळीत होताना दिसत आहे. याकडे पोलिस, आरटीओ, नगर पंचायतचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. यामुळे शहरातील व्यापारी वर्ग तसेच सर्वसामान्य जनता वैतागली आहे. याकडे प्रशासकीय यंत्रणेने वेळीच लक्ष देऊन शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे.

अधिक माहिती अशी की, जाफराबाद शहरातील पुर्णा नदीपासून ते अहिल्यादेवी होळकर चौकापर्यत सिमेंट रस्त्याचे आणि नाली बांधकाम जागतिक प्रकल्पाच्या अर्थ साहाय्यातून ठेकेदार कंपनी मार्फत सुरु आहे. परंतू सिमेंट रस्त्याचे काम शहरात सुरू असताना संबंधित कंपनीने शहरातील वाहतूकीसाठी दिशादर्शक अथवा मार्गदर्शक फलक लावलेले नाही, शिवाय लाल, हिरवी झेंडी देखील वाहनांना दाखवलेली नाही.

२० हजारांत आरोपीची बाजू मांडायला तयार झाला पोलीस निरिक्षक

येणारी- जाणारी वाहने एकाच बाजुच्या रस्त्याने वाहतूक करीत असल्याने शहरातील शिवाजी चौक, देऊळगांवराजा रस्ता, डॅा.बाबासाहेब आंबेडकर चौक, पंचायत समिती चौक, तहसिल चौकात वाहतूक कोंडी होते. दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनांसह जड वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात झाल्याने जाफराबाद शहरात अर्धा -अर्धा तास वाहतूक कोंडीमुळे खोळंबा होतो. नागरिक, शाळकरी मुले यांना तर जीव मुठीत ठेऊन रस्ता पार करावा लागतो. तर जाफराबाद शहरात विविध ठिकाणच्या दुकानासमोर पार्किंग झोन नसताना दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहने बेशिस्त पणे ऊभी केल्याने देखील पादचारी आणि वाहतूकीला अडथळा निर्माण होतो.

महिलेचे टोकाचे पाऊल, विषारी औषध घेऊन घेतला जगाचा निरोप

शिवाय दुकानांच्या समोर असंख्य वाहने उभी राहत असल्याने दुकानात जाण्यासाठीच वेळप्रसंगी ग्राहकांना रस्ता नसतो, त्यामुळे ग्राहक दुस-या कोणत्यातरी दुकानात जाते, याचा आर्थिक फटका व्यावसायिकांना बसत आहे. त्यामुळे प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन शहरातील वहातुक व्यवस्था सुरळीत करावी,अशी मागणी होत आहे.