esakal | Coronavirus: मास्कवरून नागरिक घालतायत पालिका कर्मचाऱ्यांशी हुज्जत; दंड देण्यास नकार

बोलून बातमी शोधा

corona virus}

विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करीत असताना एका दुचाकी चालकाने दंड देण्यावरून हुज्जत सुरू केली

Coronavirus: मास्कवरून नागरिक घालतायत पालिका कर्मचाऱ्यांशी हुज्जत; दंड देण्यास नकार
sakal_logo
By
दीपक सोळंके

भोकरदन (जालना): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वांना बाहेर फिरताना तोंडाला मास्क लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र, याकडे अनेकजण कानाडोळा करीत आहे. अशाविरोधात पालिकेकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. ही कारवाई करीत असतांना पालिका कर्मचाऱ्यांना अनेकदा हुज्जतींचा सामना करावा लागत असल्याचे दिसत आहे.

जिल्ह्यात एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याचे चित्र असताना दुसरीकडे शहरात विनामास्क फिरणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने सार्वजनिक ठिकाणी विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. शहरातही छत्रपती शिवाजी महाराज चौकात पालिका पथकाकडून कारवाई करण्यात येत आहे. परंतू, सदरील कारवाई करीत असताना अनेकदा पालिका कर्मचारी व नागरिकांचे खटके उडत असल्याचे दिसून येते.

Traffic Jam: जाफराबादेत सिमेंट रस्त्यांची कामं ठरतायेत वाहतूकीच्या कोंडीचे कारण...

असाच काहीसा प्रकार बुधवारी (ता.तीन) सकाळी 11 वाजेच्या सुमारास घडला. छत्रपती शिवाजी चौकात पालिका पथकातील कर्मचारी विना मास्क फिरणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करीत असताना एका दुचाकी चालकाने दंड देण्यावरून हुज्जत सुरू केली. शिवीगाळ करीत लोटलाट करून दंड देण्यास नकार दिला. यामुळे येथे काहीकाळ मोठी गर्दी जमा झाली होती. या प्रकारानंतर पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित व्यक्तिविरोधात कारवाई करण्यासाठी पोलिस ठाणे गाठले. परंतू या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.

देशसेवेनंतर माजी सैनिक रमला शेतात, चाळीस हजारांच्या गुतंवणुकीतून तीन...

पोलिस बंदोबस्तात मोहीम राबविण्याची गरज-
दरम्यान शहरात राबविण्यात येणाऱ्या विनामास्क मोहिमेत अनेकजण पालिका कर्मचाऱ्यांना जुमानत नसल्याने या मोहिमेत पोलिसांचा सहभाग असणे गरजेचे आहे. जेणेकरून नियम तोडणाऱ्यांवर जरब बसेल.