Jalna : रामायणातील युद्धकांडाच्या पहिल्या भागाचे लोकार्पण

जांबसमर्थ येथील समर्थ मंदिरात कार्यक्रम
Nashik
Nashiksakal
Summary

जांबसमर्थ येथील समर्थ मंदिरात कार्यक्रम

पिंपळगाव : चारशे वर्षांपूर्वी श्री समर्थ रामदास स्वामींनी बालवयात टाकळी(नाशिक)येथे लिहिलेल्या वाल्मिकी रामायणाचे प्रा.गणेश थिटे यांच्या मार्गदर्शनाखाली मराठीत आणि गोव्याचे लोकपाल निवृत्त न्यायमुर्ती अंबादास जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजीत पाच खंड प्रकाशित झाले आहेत. सहावे युध्दकांडाचे दोन भागात प्रकाशन करण्यात येणार आहे. त्यातील पहिल्या भागाच्या ग्रंथाचे रविवारी जांबसमर्थ(ता.घनसावंगी)येथील समर्थ मंदिरात लोकार्पण करण्यात आले.

कार्यक्रमात श्री.जोशी, भूषण स्वामी महाराज, निलेश जोशी, समर्थ मंदिराचे अध्यक्ष डॉ.भारत कुलकर्णी, सरपंच बाळासाहेब तांगडे, पुजारी रवींद्र जोशी यांची उपस्थिती होती. समर्थ वाग्देवता मंदिर धुळे येथे समर्थ रामदास स्वामींच्या स्वहस्ताक्षरातील वाल्मिकी रामायणाची संस्कृत प्रत संग्रहित आहे.

या प्रतीचे पुनर्मुद्रण मराठी,इंग्रजी भाषांतर आणि विवेचनासह बालकांड,अयोध्याकांड, अरण्यकांड, किष्किंधाकांड,सुंदरकांड प्रकाशित झाले आहेत. युध्दकांडाच्या दोन भागांपैकी एका भागाचे काम पूर्ण झाले आहे. मुख्य संपादन प्रा.गणेश थिटे यांनी केले असून प्रा.रवींद्र मुळे(औरंगाबाद),रूपाली कापरे(संगमनेर), आयआयटीचे निलेश जोशी यांनी मराठी भाषांतर केले आहे.

समर्थ भक्त तथा समर्थ वाग्देवता मंदिराचे अध्यक्ष शरद कुबेर यांनी या ग्रंथाचे प्रकाशन केले आहे. राष्ट्रीय उपक्रम म्हणून १३ वर्षांपासून समर्थ साहित्य संशोधनाचे कार्य सुरू असून हे कार्य आता अंतिम टप्प्यावर आहे. युध्दकांडाची श्‍लोकसंख्या मोठी असल्याने दोन भागात प्रकाशित होत आहेत.

पहिल्या भागात मुळ संस्कृत संहिता आहे.सुमारे ७५० पृष्ठांचा हा ग्रंथ बहुरंगी आणि आर्टपेपरवर छापलेला आहे. तळटिपा प्रत्येक पृष्ठावर आवश्‍यकतेनुसार आहेत. लवकरच दुसरा भागही प्रकाशित होणार आहे.

जांबसमर्थ : समर्थ रामदास स्वामींच्या वाल्मीकी रामायणातील युद्धकांडाचा पहिला भाग समर्थचरणी रविवारी अर्पण करण्यात आला. यावेळी गोवा राज्याचे लोकपाल तथा निवृत्त न्यायमूर्ती अंबादास जोशी, समर्थ वंशज भूषण स्वामी महाराज, नीलेश जोशी, समर्थ मंदिराचे

अध्यक्ष डॉ.भारत कुलकर्णी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com