Jalna News
sakal
मराठवाडा
Jalna News: मराठीच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या प्रश्नपत्रिका; सावळा गोंधळ, मंठा तालुक्यातील घटना
Jalna Mantha Exam Paper Error: जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यात हेलस येथील परीक्षा केंद्रावर दहावीच्या इंग्रजी विषयाच्या पेपरमध्ये गंभीर गोंधळ उघडकीस आला. मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना चुकीची सेमी इंग्रजी प्रश्नपत्रिका देण्यात आल्याने शिक्षण विभागाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून विद्यार्थ्यांमध्ये भीती आणि संभ्रमाचे वातावरण पसरले आहे.
जालना/मंठा : दहावीच्या इंग्रजी विषयाचा पेपर देणाऱ्या मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या चुकीच्या प्रश्नपत्रिका देण्याचा प्रकार मंठा तालुक्यातील हेलस येथील राजे छत्रपती संभाजी कनिष्ठ महाविद्यालय परीक्षा केंद्रावर शुक्रवारी (ता. २७) घडला.

