

Jalna News
esakal
जालना: महापालिकेने शहर स्वच्छतेसाठी दहा कोटींची निविदा गत आर्थिक वर्षात काढली होती. मात्र, ही रक्कम कमी असल्याने केवळ तीन ठेकेदारांनी निविदा भरल्याने ही प्रक्रिया रद्द करून नव्याने १४ कोटींची स्वच्छतेची निविदा काढली जाणार आहे. या नवीन निविदेची मेअखेर सर्व प्रक्रिया पूर्ण होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत मनपाच्या कर्मचाऱ्यांसह मुदतवाढ दिलेल्या पूर्वीच्या कंत्राटदारावर स्वच्छतेचा भार असणार आहे.