
छत्रपती संभाजीनगर : पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे दरवर्षी शहरातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण करण्यात आले. त्यात ४२ इमारती धोकादायक असल्याचे समोर आले. या सर्व इमारती सील करण्याचे आदेश अतिक्रमण हटाव विभागाने दिले. सर्वाधिक २६ धोकादायक इमारती झोन क्रमांक एक म्हणजेच जुन्या शहरात आहेत.