

Jalna News
esakal
उमेश वाघमारे
जालना: माणसाचा जन्म झाल्यापासून ते मृत्यू झाल्यानंतरही शासकीय कामांसाठी कागदपत्रांची गरज भासते. मात्र, महापालिकेकडून जन्मदाखला वेळेवर मिळत नसल्याचे चित्र आहे. आजघडीला महापालिकडे सुमारे ५९० जन्मदाखल्याचे अर्ज प्रलंबित पडले आहेत. बाळाच्या जन्मदाखल्यासाठी नागरिकांना मात्र मनपाकडून तारीख पे तारीख दिली जात असल्याचे चित्र आहे.