Jalna Crime: कारमधील मृत्यूचा उलगडा; पंचवीस लाखांची सुपारी देऊन खून, जालन्यातील प्रकरण, दोन संशयितांना पोलिस कोठडी
Jalna News: जालन्यात प्लॉटिंग व्यावसायिकाचा खून करून त्याने जीव दिला असा बनाव केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पैशांच्या वादातून २५ लाखांची सुपारी देण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले.
जालना : येथील प्लॉटिंग व्यावसायिक सागर धानुरे (वय ३५) याचा खून करून त्याने आत्महत्या केल्याचा बनाव करण्यात आल्याचे तपासामध्ये पुढे आल्यानंतर पोलिसांनी दोन संशयितांना सोमवारी (ता. २२) सकाळी अटक केली.