जालना : नवोदय विद्यालयाची आज निवड चाचणी परीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalna Navodaya Vidyalaya selection test today student

जालना : नवोदय विद्यालयाची आज निवड चाचणी परीक्षा

जालना : अंबा ( ता.परतूर ) येथील जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावी वर्गात प्रवेशासाठी शनिवारी जिल्ह्यात निवड चाचणी परीक्षा होणार आहे. जिल्ह्यातील ४१ परीक्षा केंद्रावर ११ हजार २२१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे,अशी माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. जिल्ह्यात सीबीएसई मंडळाचे एक जवाहर नवोदय विद्यालय परतूर तालुक्यातील अंबा या ठिकाणी आहे. नवीन शैक्षणिक वर्षात इयत्ता सहावी वर्गात प्रवेशासाठी निवड चाचणी परीक्षा दरवर्षी घेतली जाते.

जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता सहावी वर्गाची प्रवेश क्षमता ८० इतकी आहे. जिल्ह्यात शनिवारी निवड चाचणी परीक्षा घेतली जाणार आहे.परीक्षा वस्तुनिष्ठ स्वरूपाची असून शंभर गुणांची आहे. सकाळी ११.३० ते १.३० या वेळेत पेपर होणार आहे. जिल्हा शिक्षण विभाग आणि अंबा येथील जवाहर नवोदय विद्यालय यांच्या वतीने परीक्षेचे नियोजन करण्यात येत आहे. जालना शहरासह बदनापूर, अंबड, घनसावंगी, मंठा, परतूर, भोकरदन, जाफराबाद तालुका पातळीवर परीक्षा केंद्र देण्यात आले आहेत.

शहासह जिल्ह्यातील ४१ परीक्षा केंद्रावर परीक्षा घेतली जाणार आहे. शिक्षण विभाग, जवाहर नवोदय विद्यालयासह पर्यवेक्षकीय यंत्रणेत १ हजार अधिकारी,कर्मचारी नियोजनात आहेत. एका वर्गात ८० प्रवेशक्षमता असलेल्या वर्गासाठी एवढ्या मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी परीक्षेस बसले आहेत.निवासी शाळेसह सीबीएसई पॅटर्न असल्याने ग्रामीण भागातील पालकांची अपेक्षा असते की,आपलाही पाल्य या ठिकाणी शिक्षणास जावा. त्यामुळेच दरवर्षी परीक्षेसाठी संख्या वाढत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आमच्या विद्यालयातील विद्यार्थ्याची तयारी करून घेतली आहे.विद्यार्थ्यांचा प्रतिसाद चांगला असल्याचे शिक्षक संदीप इंगोले यांनी सांगितले.जवाहर नवोदय विद्यालय निवड परीक्षेकडे पाहण्याचा कल दिवसेंदिवस वाढत आहे.सीबीएसई पॅटर्न आणि इतर सुविधांसह स्पर्धात्मक वातावरण विद्यार्थी आकर्षित होतात.एका वर्गाच्या प्रवेश निवडीसाठी हजारो विद्यार्थी परीक्षा देतात,हे चांगलेच आहे.

-आर.आर.जोशी, शिक्षणतज्ज्ञ, जालना

Web Title: Jalna Navodaya Vidyalaya Selection Test Today Student

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top