jalna
jalna sakal

Jalna News : शहर सीसीटीव्हीच्या नजरेत,पालिकेचा पुढाकार; विविध भागांत ४५ सीसीटीव्ही

सीसीटीव्ही लावण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून सात कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता.

जालना - शहरात सीसीटीव्ही लावण्याचे घोंगडे मागील अनेक वर्षांपासून निधी अभावी भिजत पडले होते. मात्र, गणेश विसर्जनाच्या निमित्ताने महापालिकेकडून शहरातील विविध चौकांत तब्बल ४५ सीसीटीव्ही कॅमेरे कायमस्वरूपी बसविले जात आहेत. या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे कंट्रोल रूम पोलिस अधीक्षक कार्यालयात राहणार आहे. त्यामुळे शहरातील गुन्हेगारीला आळा घालण्यास पोलिस प्रशासनाला मोठी मदत होणार आहे.

पोलिसांना मोठी कसरत करावी लागते. त्यात जालना शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची व्यवस्था नसल्याने चोरट्यांना पायबंद घालण्यासाठी पोलिसांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे शहरात सीसीटीव्ही लावण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून सात कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता.

मात्र, या प्रस्तावाला गृहविभागासह जिल्हा नियोजन समितीकडून ही निधी उपलब्ध झाला नाही. परिणामी, शहरातील सीसीटीव्हीचा प्रस्ताव मागील अनेक वर्षांपासून धुळखात पडला होता. त्यात जालना नगरपालिकेला जालना शहर महापालिकेचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे शहरातील नागरिक सुविधांसह सुरक्षेच्या प्रश्‍नावर अधिक भर देणे गरजेचे झाले आहे.

jalna
Chh. Sambhaji Nagar : गुंठेवारी अडकली; तब्बल ७० हजार मालमत्ताधारकांना प्रतिक्षा

अशात गुरूवारी (ता.२८) गणेश विसर्जन होणार आहे. त्यामुळे दरवर्षी प्रमाणे यंदा ही विसर्जन मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम सुरू झाले आहेत. मात्र, यंदा पोलिस प्रशासनाच्या मागणीनुसार महापालिकेकडून विसर्जन मार्गातील चौकांमध्ये कायमस्वरूपी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. परिणामी, शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये कायमस्वरूपी तब्बल ४५ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे काम सुरू आहे. या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे कंट्रोल रूम पोलिस अधीक्षक कार्यालयात राहणार आहे. शिवाय गरज पडल्यास पोलिस ठाण्यात ही सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे कंट्रोल रूम देण्यात येणार आहे. या ४५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमुळे शहरातील गुन्हेगारीला मोठा आळा बसण्यास मदत होणार आहे.

jalna
Jalna News : गाडी पंक्चर झाल्याने बकऱ्या चोरांचा डाव फसला

या चौकांत कायमस्वरूपी सीसीटीव्ही

शहरातील गणेश विसर्जन मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचे काम सुरू आहेत. हे सीसीटीव्ही कायमस्वरूपी राहणार आहेत. मामा चौक, सिंधी बाजार, दानाबाजार, शौला चौक, बडी सडक, टांगा स्टँड, नेहरू रोड, सराफा रोडा, काद्राबाद, पाणीवेस, मंमा देवी, मस्तगड, गांधी चमन, शनी मंदिर हा भाग यापुढे २४ तास सीसीटीव्हीच्या नजरेत राहणार आहे.

शहरात पोलिस प्रशासनाच्या मागणीनुसार गणेश विसर्जन मार्गावर ४५ सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जात आहेत. या मार्गावरील हे ४५ सीसीटीव्ही कॅमेरे कायमस्वरूपी ठेवण्यात येणार आहेत. पोलिस अधीक्षक कार्यालयात सीसीटीव्ही कंट्रोल रूम असणार आहे.

- संतोष खांडेकर, आयुक्त, महापालिका, जालना

jalna
S. Jaishankar:विकसित राष्ट्रांचा दुटप्पीपणा; एस जयशंकर यांनी ग्लोबल नॉर्थ देशांना सुनावलं

जालना शहर महापालिकेकडून गणेश विसर्जन मार्गावर ४५ सीसीटीव्ही कॅमेरे लावले जात आहेत. महापालिका हे सीसीटीव्ही कॅमेरे कायमस्वरूपी ठेवणार असून, त्याचे कंट्रोल रूम पोलिस अधीक्षक कार्यालयात असणार आहे. शिवाय गजर भासल्यास पोलिस ठाण्यात सीसीटीव्ही कंट्रोल रूम केली जाईल.

- शैलेश बलकवडे, प्रभारी पोलिस अधीक्षक, जालना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com