

Badnapur Road Accident Claims Life of 42 Year Old Hanuman Kharat from Sukhapuri on Chhatrapati Sambhajinagar Jalna Road
esakal
-अशोक चांगले
सुखापुरी : अंबड तालुक्यातील सुखापुरी येथील रहिवासी हनुमान केरूभान खरात (वय ४२ वर्षे) यांचा अज्ञात वाहनाने धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. रविवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी रात्री अंदाजे ८.३० ते ९ वाजण्याच्या दरम्यान संभाजीनगर ते जालना रोड बदनापूर येथे हा अपघात घडला.