Jalna News : तूर, कापूस पिकावर अळ्यांचा हल्ला; ढगाळ वातावरणाचा परिणाम उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता

मात्र गेल्या दोन दिवसांपासून आकाशात ढगांची गर्दी होत असून वातावरणात दमटपणा आला असून पाणधुई दिसून येत आहे.
jalna
jalna Esakal

शहागड - शहागडसह परिसरात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून दमटपणा आला आहे. यामुळे तूर, कापूससह फळपिकांवर अळ्यांनी हल्ला चढवला आहे.शहागडसह परिसरातील शेतशिवारात खरीप हंगामात अल्पसा पाऊस झाल्याने कशीबशी शेतकऱ्यांनी पिके जगवली. मात्र उत्पादन निम्‍म्याने घडले.

मात्र गेल्या दोन दिवसांपासून आकाशात ढगांची गर्दी होत असून वातावरणात दमटपणा आला असून पाणधुई दिसून येत आहे. निसर्गाच्या लहरी वातावरणामुळे तूर, कापसासह फळबागांवर अळ्यांनी हल्ला चढवला आहे. यामुळे पीक नुकसान होऊन उत्पादनात घट होण्याची दाट शक्यता आहे. निसर्गाच्या लहरीपणाचा काढणीला आलेल्या सोयाबीन, बाजरी आदी पिकांना फटका बसण्याची शक्यता आहे.यावर्षी खूपच कमी पाऊस झाल्याने पीक परिस्थिती जेमतेम आहे. पुन्हा निसर्गाच्या लहरी वातावरणामुळे पिकांवर विविध रोग पडू लागले आहेत.

विनायक मचे, शेतकरी, शहागड

ढगाळ व धुरकट हवामानामुळे तुरीचे पाने अळी पडल्याने गुंडाळून जात आहेत. तुरीवर मोठ्या प्रमाणावर अळी पडू लागल्याने उत्पादनात घट येऊ शकते.

राजेश निवारे, शेतकरी, गंधारी

jalna
Jalna News : शॉर्टसर्किटमुळे २० एकर ऊस जळाला़; शेतकऱ्यांचे तीस लाखांचे नुकसान

तूर पीक सद्यःस्थितीमध्ये कळी अवस्थेत आहे. त्यामुळे पिकांचे निरीक्षण व सर्वेक्षण करून एकात्मिक पीक संरक्षण करावे. याकरिता हेक्टरी ५० पक्षी थांबे बसवावेत. कामगंध सापळे हेक्टरी ५ लावावेत. आर्थिक नुकसान पातळी ओलांडली नसल्यास कळी अवस्थेत पाच टक्के निंबोळी अर्काची फ़वारणी करावी.

सचिन गिरी,

तालुका कृषी अधिकारी,अंबड.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com