NEET Result : पितृछात्र हरपलेल्या रश्मीची 'नीट' परीक्षेत गगणभरारी; वडिलांचं स्वप्न साकार

NEET Result
NEET Result

जालना (अंबड) : अंबड तालुक्यातील दाढेगाव येथील रहिवासी व अंबड शहरातील चांगलेनगर रहिवासी रश्मी प्रकाश अकोलकर हिने नीट परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. अखेर मुलीने डॉक्टर होण्याचं वडीलांचं स्वप्न पूर्ण करण्याकडे आगेकूच केली आहे.

NEET Result
Beed News : कार्यशैलीचा परिणाम? पालकमंत्री सावेंच्या कार्यक्रमाला भाजपचेही लोकप्रतिनिधी नाही

पितृछात्र हरपल्यानंतर रश्मीला शिक्षणासाठी मोठा संघर्ष करावा लागला. रश्मी हिचे शिक्षण मत्स्योदरी शिक्षण संस्थेत झाले. वडील प्रा. प्रकाश अकोलकर हे शहरातील मत्स्योदरी कनिष्ठ महाविद्यालयात मराठी विषयाचे प्राध्यापक होते. शिक्षणावर मनापासून प्रेम करणारा माणूस शेवटपर्यंत व्यसनापासून कोसोमैल दूर राहिलेला.

कामावर प्रचंड श्रद्धा बाळगणारा तसेच आपल्या व्यवसायावर निष्ठा ठेवणारा हसतमुख शिक्षक म्हणून समाजात अकोलकर यांची ओळख होती. मुलांच्या शिक्षणासाठी ते छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्यास असताना भल्या पहाटे वॉर्निंग वॉकला जात असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्यांचे निधन झाले.

रश्मीचे पितृछात्र हरपले. मुलांच्या शिक्षणासह संगोपनाची संपूर्ण भिस्त रश्मीच्या आईवर आली. दुःखाचा डोंगर झेलत मुलांच्या शिक्षणासाठी आई मुलांना शिक्षणासाठी प्रोत्सान, प्रेरणा देत होती. अशा परिस्थितीतून सावरण्याचे काम केले. रश्मी ही मुळातच गुणवान, अभ्यासू व जिज्ञासू.

NEET Result
Beed News : कार्यशैलीचा परिणाम? पालकमंत्री सावेंच्या कार्यक्रमाला भाजपचेही लोकप्रतिनिधी नाही

तिने पितृछात्र हरपल्यानंतर एककीकडे दुःख झेलत तर दुसरीकडे वडीलांची आपण डॉक्टर बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठ्या मेहनतीने नीट परीक्षेची तयारी करून 720 पैकी 638 गुण मिळवीत घवघवीत यश संपादन केले आहे.

शाळा, महाविद्यालयात शिक्षण घेत असताना रश्मी प्रत्येक स्पर्धा परीक्षेत नेहमीच गुणवत्ता यादीत नंबर एकला राहिली. रश्मीला शिक्षणाची प्रचंड आवड होती.

रश्मीचा गौरव

रश्मी अकोलकर हिने नीट परीक्षेत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल माजी मंत्री तथा मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आमदार राजेश टोपे, सचिव मनिषाताई टोपे, प्रशासकीय अधिकारी डॉ. बाबासाहेब गायकवाड, प्राचार्य डॉ. शहाजीराव गायकवाड, सहप्रशासकीय अधिकारी राहुल भालेकर, मुख्याध्यापक अरविंद देव, प्रा.पांडुरंग काळे यांच्यासह आदींनी तिचा गौरव केला.

शिक्षण घेताना नेहमीच अभ्यासात सातत्य ठेवणे गरजेचे आहे. मनात शिक्षणाचा ध्यास बाळगताना उच्च स्वप्न पाहिल्यास आणि चिकाटीने परिश्रम करण्याची तयारी ठेवल्यास यश निश्चित मिळते.

- रश्मी प्रकाश अकोलकर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com