

Jalna News - अंतरवाली सराटी येथील पोलिस आणि ग्रामस्थांमध्ये तुफान मारहाण झाली होती. त्यांचे पडसाद शनिवारी (ता. दोन) जालना शहरात रास्ता रोको आंदोलन दरम्यान आंदोलकांनी तुफान दगडफेक केली. त्यामुळे पोलिसांनी हवेत गोळीबार करत, अश्रूधुराच्या नळकांड्याचा मारा केला. त्यामुळे जालना शहरात आंदोलनाला हिंसक वळण मिळाले आहे.
जालना शहरातील अंबड चौफुली येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. मात्र, या आंदोलनात शहरासह परिसरातील समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले. हा जमाव अनियंत्रित होऊन आंदोलकांनी खाजगी वाहनांची जाळपोळ सुरू केली.
यात अंबड रोडवरील उभा असलेला एक ट्रक जमवणे जाळली. शिवाय काही खासगी वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर आक्रमक झालेल्या जमावाने पोलिसांच्या दिशेने तुफान दगडफेक सुरू केली. त्यामुळे रस्त्यावर दगड, विटांचा खाच पडला होता.
आक्रमक झालेला जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार करत अश्रूधुराचा मारा केला. त्यानंतर आंदोलनक पाळले. मात्र, आंदोलनातील तरुणांकडून पोलिसांवर दगडफेक सुरु होती.
त्यामुळे आंदोलनात हिंसक वळण लागलेले असून अधून मधून पोलिसांवर आंदोलकांकडून दगडफेक सुरू आहे. सध्या शहरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात केला असून तणावपूर्ण शांतता आहे. (Latest Marathi News)
पत्रकारांना मारहाण
आंदोलनाचे वृत्तांकन करण्यासाठी गेलेल्या काही पत्रकारांना काही आंदोलकांनी शिवीगाळ करत मारहाण केली. शिवाय जाळपोळीचे छायाचित्रे, चलचित्र घेण्यापासून आंदोलकांनी पत्रकारांना रोखले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.