Jalna News : सेलगावात टॉवरवर चढून शोले स्टाईल आंदोलन, चार तासानंतर टॉवरखाली उतरले मराठा आंदोलक

नायब तहसीलदार रामेश्वर दळवी, मराठा मोर्चाच्या समन्वयक यांनी आवाहन केले
jalna protest
jalna protest Esakal

बदनापूर - तालुक्यातील सेलगाव येथे आरक्षणाच्या मुद्यावर मराठा समाज बांधव आक्रमक झाले आहेत. गावाजवळील मोबाईल टॉवरवर चढून २५ ते ३० मराठा आंदोलकांनी सोमवारी (ता. ३०) दुपारी थेट मोबाईल टॉवरवर चढून चार तास ठिय्या आंदोलन केले.

यावेळी मराठा आंदोलकांनी "एक मराठा - लाख मराठा", "आरक्षण आमच्या हक्काचे" अशा जोरदार घोषणा देत अवघा आसमंत दणाणून सोडला. यावेळी आंदोलकांना खाली उतरण्यासाठी बदनापूर ठाण्याचे निरीक्षक सुदाम भागवत,

नायब तहसीलदार रामेश्वर दळवी, मराठा मोर्चाच्या समन्वयक यांनी आवाहन केले, अखेर त्यास प्रतिसाद देत त्यांनी तूर्त आंदोलन मागे घेतले. या आंदोलनात शुभम अंभोरे, सुनील अंभोरे, नील अंभोरे, धीरज अंभोरे, संभाजी अंभोरे, अमोल अंभोरे, एकनाथ अंभोरे, अनिल अंभोरे, बळीराम अंभोरे, शिवाजी अंभोरे आदींसह ईतर मराठा समाजातील तरुणांनी सहभाग घेतला होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com