
जालना : तंत्रज्ञानाचा गैरवापर करुन गुन्हे घडतात. अशा गुन्हेगारांना रोखण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करून सॉफ्टवेअर तयार करीत आहोत. सर्वच गुन्हेगारांची छायाचित्रांसह माहिती (डेटा) संकलित करून या सॉफ्टवेअरमध्ये अपलोड करण्याचे काम सध्या सुरू केले आहे. हे काम एक ते दीड महिन्यात पूर्ण होईल, अशी माहिती जालना जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी दिली.