Jalna News: जालन्यात ‘गावठी पिस्तूलधारी’ वाढले; चार दिवसांत पाच अटकेत; तीन कट्टे, १६ काडतुसे जप्त
Jalna Crime: जालना जिल्ह्यात पोलिसांनी गावठी पिस्तूलधाऱ्यांविरुद्ध कारवाई करत पाच जणांना अटक केली. यामध्ये तीन कट्टे आणि सोळा जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.
जालना: जालना जिल्ह्यात ‘गावठी पिस्तूलधारी’ (कट्टा) वाढल्याचे चित्र आहे. पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने गेल्या चार दिवसांत केलेल्या कारवायांत पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत. एकूण तीन कट्टे आणि सोळा जिवंत काडतुसे जप्त केली आहेत.