जालना : जिल्ह्यात अखेर सर्वदूर पावसाची हजेरी

उमेश वाघमारे
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

मागील अनेक दिवसांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर शुक्रवारी (ता. 30) मध्यरात्रीनंतर जिल्ह्यात सर्व दूर पावसाने हजेरी लावली. यात सहा मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे. ​

जालना : मागील अनेक दिवसांच्या मोठ्या प्रतिक्षेनंतर शुक्रवारी (ता. 30) मध्यरात्रीनंतर जिल्ह्यात सर्व दूर पावसाने हजेरी लावली आहे. यात सहा मंडळात अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात शनिवारी (ता.31) सकाळी आठ वाजेपर्यंत सरासरी 32.59 मिलिमीटर पाऊस झाल्याची नोंद झाली आहे. यात जालना मंडळात 75 मिलिमीटर, पाचनवडगाव मंडळात 70 मिलमीटर, बदनापुर तालुक्यातील सेलगाव मंडळात 65 मिलिमीटर, भोकरदन तालुक्यातील भोकरदन मंडळात 77 मिलिमीटर, राजुर मंडळात 79 मिलिमीटर, अंबड तालुक्यातील गोंदी मंडळात 66 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

तसेच जालना तालुक्यातील रामनगर मंडळात 60 मिलिमीटर, विरेगाव मंडळात 48 मिलिमीटर, बदनापुर तालुक्यातील बदनापुर मंडळात 45 मिलिमीटर, दभाडी मंडळात 62 मिलिमीटर, भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेनुकाई मंडळात 55 मिलिमीटर, परतुर तालुक्यातील परतुर मंडळात 63 मिलिमीटर, अंबड तालुक्यातील अंबड मंडळात 53 मिलिमीटर, धनगरपिंपरी मंडळात 48 मिलिमीटर, घनसावंगी तालुक्यातील घनसावंगी मंडळात 62 मिलिमीटर, राणी उंचेगाव मंडळात 47 मिलिमीटर, राजनी मंडळात 45 मिलिमीटर, तीर्थपुरी मंडळात 42 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे खरीप पिकांना आधार मिळाला आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Jalna: The presence of heavy rainfall in the district at the end