
जालना : शेतजमिनीसंदर्भातील याचिकेच्या आक्षेपाचा निकाल सकारात्मक लावण्यासाठी पाच लाखांची लाच मागणाऱ्या सहायक महसूल अधिकारी राजेंद्र श्रीपतराव शिंदे (वय ४१) याला गुरुवारी (ता.१५) रात्री अटक केली. दरम्यान, शुक्रवारी (ता.१६) न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.