

Jalna
esakal
जालना: जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून करण्यात आलेल्या जालना तालुक्यातील इंदेवाडी ते सिरसवाडी रस्त्याचे काम न करताच लाखोंचे बिल उचलल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी तालुक्यातील ६० रस्त्यांची त्रयस्थ समितीमार्फत चौकशी केली. दरम्यान, साठपैकी पंचवीस रस्त्यांच्या कामात अनियमितता आढळून आल्याचे जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी सांगितले.