jalna : साक्षी विनायकाचे दर्शन झाले दुर्मीळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 साक्षी विनायकाचे मंदिर पाण्याखाली जाते

jalna : साक्षी विनायकाचे दर्शन झाले दुर्मीळ

कुंभार पिंपळगाव : राजाटाकळी (ता.घनसावंगी) परिसरातील गोदावरी नदीपात्र तुडुंब भरलेले आहे. परिणामी गोदावरी नदीच्या पात्रात असणारे साक्षी विनायकाचे मंदिर पाण्याखाली जाते. परिणामी भाविकांना साक्षी विनायकाचे दर्शन दुर्मीळ झाले आहे. केवळ कळसाला पाहून भाविकांना हात जोडावे लागतात.

राजाटाकळी येथील गोदावरीच्या पात्रात पुरातन अशी साक्षी विनायक गणपतीची मूर्ती आहे. उन्हाळ्यात गोदावरीचे पाणी ज्या वेळेला कमी होते त्यावेळेला दर तीन वर्षांनी साक्षी विनायकाचे दर्शन भाविकांना सहज करता येते. मात्र गोदावरी नदीवर आता बंधारा झाल्याने पात्र नेहमीच तुडुंब भरलेले असते. परिणामी आता साक्षी विनायकाचे दर्शनच दुर्मीळ झाले आहे. मंदिर पाण्यात असून अलीकडच्या आणि पलीकडच्या गोदाकाठावरूनच साक्षी विनायकाला हात जोडावे लागतात.

राजाटाकळी गावात तुळजाभवानी देवीचे मंदिर आहे. देवी सोबतच साक्षी विनायक आले होते, मात्र देवीच्या भीतीने ते गोदापात्रात वाळूत अंतर्धान पावले, अशी आख्यायिका सांगितली जाते. गणेशपुराणात,मृदगळ पुराणातही या मूर्तीचा उल्लेख आढळतो. पात्राच्या मधोमध वाळूत साडेचार फूट उंच आणि २२ इंच रुंद अशी गणपतीची मूर्ती आहे. दरवेळेला उन्हाळ्यात गोदावरीचे पाणी आटत होते, त्यावेळेला मूर्ती दृष्टीस पडत होती. भाविक दर्शन करायचे त्यानंतर पुन्हा पावसाळ्यात गोदावरीला पाणी यायचे, मूर्ती पुन्हा वाळूत झाकली जायची.

काही वर्षांपूर्वी ही मुर्ती वाळूतून बाहेर काढून पारावर बसवली, नंतर तेथे मंदिर बांधले. मात्र दोन-चार वर्षांपासून गोदापात्रातले पाणी आटलेच नाही, यामुळे आजही मंदिर, मूर्ती पाण्यात आहे. त्यामुळे भाविकांना साक्षी विनायकाचे दर्शन आता दुर्मीळ झाले आहे. गोदापलिकडच्या गेवराई, माजलगाव तालुक्‍यातील व अलीकडच्या गावातील भाविकांना दुरूनच कळसाचे दर्शन घ्यावे लागत आहे.

Web Title: Jalna Sakshi Vinayak Darshan Rare

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..