
जालना : शिवसेनेकडून पालिका निवडणुकीची मोर्चेबांधणी
जालना : आगामी नगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेच्या वतीने मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. दरम्यान, बुधवारी (ता.१३) पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. तसेच सदस्य नोंदणीला प्रारंभ झाला. नगरपालिकेसाठी इच्छुक असणाऱ्यांचे अर्ज गुरुवारपासून (ता.१४) भरून घेतले जाणार आहेत.
जिल्हा शिवसेनेच्या जिल्हा कार्यकारिणी बैठक बुधवारी (ता.१३) शिवसेना भवन येथे उपनेते अर्जुन खोतकर, उपनेते लक्ष्मण वडले, सहसंपर्कप्रमुख शिवाजी चोथे, जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे. बोराडे, माजी आमदार संतोष सांबरे, युवासेना राज्यविस्तारक अभिमन्यु खोतकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या बैठकीनिमित्त शिवसेना सदस्य नोंदणीस प्रारंभ करण्यात आला.
या बैठकीत जालना, भोकरदन, अंबड, परतूर या नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी शिवसेना पक्षाच्या वतीने इच्छुक उमेदवारांसाठी अर्ज उपलब्ध करून देण्यास सुरुवात करण्यात आली. दरम्यान इच्छुक उमेदवारांचे ता. १४ ते ता.१६ जुलै दरम्यान अर्ज भरून घेण्यात येतील, तर ता. १७ जुलैपर्यंत अर्ज जमा केले जातील.
इच्छुकांच्या घेणार मुलाखती
पालिका निवडणुकीसाठी अर्ज भरणाऱ्या शिवसेनेतील इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या जाणार आहेत. यात ता. २० जुलैला भोकरदन, अंबड, परतूर नगरपरिषद व ता. २१ जुलै रोजी जालना नगरपालिकेसाठी इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत, असे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर, ए.जे.बोराडे यांनी कळविले आहे.
Web Title: Jalna Shiv Sena Front Municipal Elections
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..