A 3-year-old girl in Jalna dies after a brutal attack by a pack of stray dogs

A 3-year-old girl in Jalna dies after a brutal attack by a pack of stray dogs

Sakal

Jalna Dog Attack : जालन्यात मोकाट श्वानाच्या हल्ल्यात तीन वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

Stray Dogs Kill 3-Year-Old Girl : जालना येथील यशवंत नगरमध्ये सोमवारी पहाटे मोकाट श्वानांच्या हल्ल्यात परी दीपक गोस्वामी (वय ३) या चिमुकलीचा मृत्यू झाला; महापालिकेच्या दुर्लक्षामुळे संतप्त प्रतिक्रिया.
Published on

जालना : शहरातील यशवंत नगर परिसरात सोमवारी (ता.२०) सकाळी तीन वर्षाच्या चिमुकलीचा अस्तव्यस्त मृतदेह आढळून आला. परी दीपक गोस्वामी (वय तीन वर्ष) असं या चिमुकलेचे नाव आहे. या चिमुकलीवर श्राणाने हल्ला चढवून तिचे लचके तोडल्याने तिचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. मृतदेह उत्तरे तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णाला दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com