जालना : चोर समजून मारहाणीत एकाचा मृत्यू

मानदेऊळगाव परिसरात रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास पाऊस सुरू होता
 case
casesakal

जालना : चोर असल्याचे समजून केलेल्या बेदम मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना मानदेऊळगाव (ता. जालना) येथे रविवारी (ता.१८) रात्री घडली. संजय प्रभाकर पवार (वय ३५, रा. घाणेवाडी, ता. जालना) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. चंदनझिरा पोलिसांनी आज दोन संशयितांना अटक केली आहे.

मानदेऊळगाव परिसरात रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास पाऊस सुरू होता. त्यामुळे संजय प्रभाकर पवार हे गावातील विलास डोळसे यांच्या घरासमोर आडोशाला उभे होते. मात्र, चोर असल्याचे समजून संजय पवार यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना दुसऱ्या दिवसी उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी तपासून संजय पवार यांना मृत घोषित केले.

याप्रकरणी रामेश्‍वर पवार यांनी पोलिसांत फिर्याद दिली. त्यानुसार विलास डोळसे, शरद डोळसे, संतोष लहाने (सर्व रा. मानदेऊळगाव, ता. जि. जालना) या संशयितांविरुद्ध चंदनझिरा पोलिस ठाण्यात काल रात्री उशिरा गुन्हा दाखल झाला.

पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांनी चंदनझिरा पोलिस ठाण्याला आज भेट देऊन या प्रकरणाच्या तपासासंदर्भात पोलिसांना सूचना दिल्या. पोलिसांनी शरद डोळसे, संतोष लहाने या संशयितांना अटक केली असून विलास डोळसे फरारी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com