

Jalna News
esakal
जालना: देखभाल-दुरुस्तीच्या नावाखाली वीज केव्हाही गुल होते. ‘मॉन्सूनपूर्व कामांसाठी आज अमुक भागात वीज दोन तास बंद राहणार’ असा मेजेस महावितरणकडून टाकला जातो आणि विजेच्या कमी-जास्त दाबाचा (फ्लक्च्युएशन) ‘खेळ’ सुरू होतो. दिवसा तापमानाचा पारा चाळिशीपुढे गेल्याने नागरिक घामाघूम होतात. रात्री कसाबसा डोळा लागतो तोच वीज गायब होते. हा प्रकार रात्रभर सुरू राहतो आणि झोपेचे खोबरे होते! या अघोषित भारनियमनामुळे अवघे शहरवासी होरपळले. वीज बिल भरण्यासाठी एका दिवसाचीही सवलत तुम्ही देत नाही, मग अखंड वीजपुरवठा करण्याची तुमची जबाबदारी नाही का, महावितरण काय फक्त वसुलीसाठीची यंत्रणा आहे का, असे प्रश्न सर्वसामान्य विचारत आहेत.