School Safety Issue: उटवदच्या जिल्हा परिषद शाळेसमोर 133 केव्ही तारा; 250 विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका, वारंवार निवेदनांनंतरही महावितरणचे दुर्लक्ष

उटवद येथील जिल्हा परिषद श्री चैतन्यपुरी विद्यालयासमोर 133 केव्ही वाहिनी व झुकलेल्या तारांचा विद्यार्थ्यांच्या जीवितास गंभीर धोका; वारंवार निवेदनांनंतरही महावितरणकडून दुर्लक्ष, पालक व ग्रामस्थ संतप्त
Life-Threatening Hazard: High-Voltage Lines at School Entrance

Life-Threatening Hazard: High-Voltage Lines at School Entrance

Sakal

Updated on

रामनगर : जालना तालुक्यातील जिल्हा परिषद श्री चैतन्यपुरी विद्यालय उटवद शाळेच्या प्रवेशद्वारासमोरूनच कमी उंचीवरून गेलेल्या 133 केव्ही विद्युत वाहिनीमुळे 250 हून अधिक विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. शाळा व्यवस्थापन समितीने वारंवार निवेदन देऊनही महावितरण कंपनीने दुर्लक्ष केल्याने पालकांमध्ये तीव्र संताप आहे.शाळेच्या परिसरात मोठ मोठी झाडे असल्याने काही झाडाच्या फांद्या ह्या विद्युत तारेच्या वरून गेली आहे.वादळी वाऱ्यामुळे झाड कोसळली तर विजेच्या तारा तुटल्या जावू शकतात.दर वर्षी शाळेच्या परिसरात विजेच्या तारा तुटल्या असल्याने काही गावकरी यांनी सांगितले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com